रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त   

विशेष पोलीस महानिरिक्षकपदी निस्सार तांबोळी 

मुंबई : राज्य सरकारने सात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई रविंद्र शिसवे यांची सह आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे. तर निकम शारदा वसंत यांची सह आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग या पदावरून विशेष पोलीस महानिरिक्षक अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स या पदावर बदली करण्यात आली आहे.
 
पोलीस सहआयुक्त नागपूर शहर निस्सार तांबोळी यांची विशेष पोलीस महानिरिक्षक राज्य राखीव पोलीस बल नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. अमरावतीचे पोलीस आयुक्त एन.डी.रेडडी यांची पोलीस सहआयुक्त नागपूर शहर या पदावर बदली करण्यात आली आहे. पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असणा-या सुप्रिया पाटील यादव यांची विशेष पोलीस महानिरिक्षक आस्थापना महाराष्ट्र राज्य या पदावर बदली करण्यात आली आहे. तर विशेष पोलीस महानिरिक्षक राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य राजीव जैन यांची विशेष पोलीस महानिरिक्षक सागरी सुरक्षा या पदावर बदली करण्यात आली आहे.मुंबई उत्तर विभागाचे अपर पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे यांची विशेष पोलीस महानिरिक्षक प्रशासन मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे.
 

Related Articles